BULDANA LIVE EXCLUSIVE ते फुलपाखरू की कीटक ? सुरू असलेल्या चर्चांना कीटक अभ्यासक प्रा. अलोक शेवडे यांच्या उत्तराने पूर्णविराम! काय म्हणाले, प्रा. शेवडे? वाचा.. 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातील खालील बीन वलीद नगर येथे काल रात्री ११च्या सुमारास एक अनोख्या प्रकारचे कीटक आढळले. दरम्यान, हे पेना एवढे फुलपाखरू असल्याची चर्चा होती. किंबहुना, त्या फोटोतून देखील आम्हाला व सर्वांनाच तसेच ते फुलपाखरू असल्याचेच जाणवले. पत्रकार कासिम शेख यांनी आपल्या कॅमेरात हे अद्भुत आणि अनोखे चित्र टिपले. दरम्यान, या कीटकाचे फोटो पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. यानंतर बुलडाणा लाइव्हने या कीटकाची माहिती जाणून घेण्यासाठी कीटक अभ्यासक व  प्रबोधन विद्यालयातील प्राध्यापक अलोक शेवडे यांच्याशी संपर्क केला. यावेळी त्यांनी जी माहिती दिली, ती अतिशय महत्त्वपूर्ण आणि विश्लेषण युक्त आहे. 

  प्रा. अलोक शेवडे वर्षानुवर्षे कीटक संशोधनात गुंतलेले आहे. नाना प्रकारच्या कीटक प्रजाती त्यांनी कॅमेराबद्ध केले असून प्रशासनानेही राज्यस्तरीय त्यांची दखल घेतली आहे. बुलढाण्यातील बोथा, राजूर अशा घाटांमध्ये त्यांनी नवनवीन कीटक प्रजाती शोधून काढल्यात. काल रात्री आढळलेल्या कीटका विषयी बोलताना त्यांनी स्पष्टच सांगितले की, हे फुलपाखरू नसून (moth) मॉथ नावाचा पतंग आहे. एक मादी पतंग असा हा कीटक आहे. Luna moth..moon moth.. असे त्याचे नाव आहे. त्याचा पाठीवर विषारी वर्ख किंवा पावडर बेस रंग दिसून येतो. (silk moth..) पावसाळ्यात ही मादी एकावेळी पाचपन्नास अंडी घालते. अंडी घालण्यासाठी खूप अधीर झालेली असते..अंडी एखाद्या पानावर किंवा कुठल्याही कोरड्या पृष्ठावर वर देते..तसेच भरभरून अंडी घालते आणि तिचा जीवनक्रम संपतो.. खूप मुलायम रेशमी त्वचा या कीटकाची आहे. परंतु घाण, उग्र दर्प स्वरूपाचे हे कीटक असल्याने हाताळल्यास शेपटी कडून घाणेरडा दुधाळ स्त्राव येतो...मूनमॉथ किंवा ल्यूना म्हणजे चंद्र पतंग... चिमणी प्रमाणेच खूप उंचावर उडून जाऊ शकतो.. अगदी दोन मजली इमारतीच्या वर सुद्धा.. बहुदा रात्रीच्या वेळेसच हा पतंग कीटक आढळतो. असे कीटक अभ्यासक प्रा. आलोक शेवडे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.
फुलपाखरू आणि "पतंग" यांच्यात फरक काय? 
सहसा फुलपाखरू हे दिवसा दिसून येते. फुलपाखराला आपली पंख बंद करता येतात. परंतु पतंगाला आपले पंख बंद करता येत नाही. बहुदा रात्रीच्या वेळेसच पतंग दिसून येत असतात. अशी माहिती कीटक अभ्यासक प्रा. अलोक शेवडे यांनी दिली.