४ दिवसांत १० तरुणी बेपत्ता; बेपत्ता होणाऱ्या मुलींचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर चॅलेंज!

पण मनावर कोण घेईल..?आई–वडील रडून रडून दमले; फोटो पहा, तुम्हाला कुणी दिसले तर कळवा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बिचारे आई वडील लाडक्या लेकीसाठी काय काय नाही करीत..? बाप तर लेकीच्या बाबतीत हळव्या काळजाचा असतो..तिच्यासाठी तो खूप झटतो, लेकीला चांगलं शिकवायच, चांगल घडवायचं यासाठी तो खूप कष्ट घेतो..तिच्या संसाराचीही काळजी त्यालाच असते.. तिचं चांगलं लग्न व्हावं, चांगला जोडीदार मिळावा..यासाठी बिचारा बाप काहीही करायला तयार असतो...अर्थात हा "बाप महिमा" इथे सांगण्याच हेच की गेल्या ४ दिवसांत १२ बापाची अवस्था केविलवानी झाली..त्यांच्यासोबत त्यांची अर्धांगिनीही बिचारी धाय मोकलून रडत आहे.. त्यांना पोलिसांकडून मदतीची अपेक्षा आहे,मात्र "कायदा" काही त्यांच्या मदतीला फारसा धावून आल्याचे दिसत नाही..होय, जिल्ह्यातून गेल्या ४ दिवसांत १२ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत..तशी नोंद पोलिसांनी केली खरी मात्र बेपत्ता झालेल्या तरुणी सज्ञान असल्याने पोलीस फारसे मनावर घेत नाहीत..
 
 बुलडाणा जिल्ह्यातून मुली तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र काही थांबत नाहीत. बेपत्ता होणाऱ्या मधल्या काही मुली प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्याने बेपत्ता होतात. प्रियकरा सोबत निघून पळून जातात, मात्र इकडे समाजात ताठ मानेने जगणाऱ्या बापाची किंमतही त्या करत नाहीत. सगळ्याच प्रेम प्रकरणातून बेपत्ता होतात असेही नाही. इतरही अनेक कारणे असू शकतात..केवळ वयाने सज्ञान आहे म्हणजे त्या स्वतःहून गायब होतात हा तर्क लावणेही पटत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकरणात विशेष लक्ष घालण्याची गरज आहे..बुलडाणा जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी अशा ४ दिवसांत १२ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. या बातमीत दिलेल्या वर्णनाच्या तरुणी आपल्याला दिसल्या तर जवळच्या पोलिसांना माहिती द्या असे आवाहन "बुलडाणा लाइव्ह" करत आहे. जेणेकरुन तुमच्या एखाद्या कृतीने एखाद्या बापाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येऊ शकते...
या मुली झाल्यात गायब..
सुजाता सुरेश वाघ २२, जामोद), श्रुती प्रकाश सदाफळे(२१मलकापूर,),सौ. ऐश्वर्या वृषभ चव्हाण (२२, मलकापूर), समीक्षा प्रशांत मेढे (१९, वडनेर भोलजी, नांदुरा), दिपाली पंढरी वानखेडे (२१, वडनेर भोलजी), संजना श्रीकांत धोटे (२३, नांदुरा), शितल श्रीकृष्ण पिंपळजे (२०, निमकवळा, खामगाव), वैष्णवी रामभाऊ तायडे(२०,सोनाळा, जळगाव जामोद), सानिया अंजुम शेख (२०, मेहबूब नगर, खामगाव) ...