…म्हणून मुस्लिम बांधव म्हणतात ‘रमजान’मध्ये लोडशेडिंग नको!
मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 14 एप्रिलपासून इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर अन्नपाणी सेवन न करता उपवास ठेवतात. उन्हाळा सुरू असल्याने वाढलेल्या भयंकर तापमानामुळे उपवासात त्रास होईल. पहाटे 3 वाजता स्वयंपाक करणे, नमाज पठण करणे या कामात महिलांना त्रास होईल. पहाटे नमाज तरावीह व कुराण …
Apr 6, 2021, 14:15 IST
मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 14 एप्रिलपासून इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर अन्नपाणी सेवन न करता उपवास ठेवतात. उन्हाळा सुरू असल्याने वाढलेल्या भयंकर तापमानामुळे उपवासात त्रास होईल. पहाटे 3 वाजता स्वयंपाक करणे, नमाज पठण करणे या कामात महिलांना त्रास होईल. पहाटे नमाज तरावीह व कुराण पठण करत असतात. त्यामुळे रमजान महिन्यात वीज भारनियमन करू नये, अशी मागणी मलकापूर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांनी वीज महावितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना जलील वहीद शेख, फजल खान मजीत पठाण, निशान खान, शेख तालिब, राजिक पटेल, एजाज खान, सय्यद आसिफ उपस्थित होते.