हिवरा आश्रम : विवेकानंद कोविड सेंटरमधील सुविधांबद्दल पालकमंत्री समाधानी

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रम येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर त्वरित सुरू करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. काल, 15 मे रोजी त्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सोबतच विवेकानंद कोविड सेंटरला भेट देऊन सुविधांद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः हिवरा आश्रम येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्‍णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर त्‍वरित सुरू करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. काल, 15 मे रोजी त्‍यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सोबतच विवेकानंद कोविड सेंटरला भेट देऊन सुविधांद्दल समाधान व्‍यक्‍त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्‍मानंद थोरहाते आदी उपस्‍थित होते.

विवेकानंद आश्रमातर्फे कोरोना रुग्णांसाठी विवेकानंद कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रींची आरोग्यसेवा गत्‌ 50 वर्षांपासून समाजाच्या सेवेत आहे. ही आरोग्य सेवा अविरत सुरू राहावी व जनतेचे दुःख कमी करता यावे या हेतूने संस्था हा उपक्रम राबवित आहे. कोविड सेंटरमध्ये असलेली स्वच्छता, निसर्गरम्य व आध्यात्मिक, प्रेरणादायी परिसर, तज्‍ज्ञ डॉक्टर्स तसेच संस्थेमार्फत रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना दिली जाणारी मोफत भोजन निवास व्यवस्था व शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात सुरू असलेले उपचार पाहून मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ.आशिष चांगाडे, डॉ. गजानन गिऱ्हे, डॉ. भूषण पागोरे, डॉ. नयना चांगाडे, विजय ठोकरे, शिवा कोंडेकर, राजेश रौंदळकर यांची उपस्थिती होती.