रायपूरमध्ये एटीएम बनले शोभेची वस्‍तू!

रायपूर, ता. बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम सतत बंद राहत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. हे एटीएम कधी चालू तर कधी बंद असते. आता गेल्या 15 दिवसांपासून हे एटीएम बंद आहे. एटीएम सतत सुरू ठेवावे, त्यात पैशाचा भरणा करावा, अशी मागणी गावकरी करत आहेत. रायपूरला राष्ट्रीयीकृत एकमेव बँक असून, याच …
 

रायपूर, ता. बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम सतत बंद राहत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. हे एटीएम कधी चालू तर कधी बंद असते. आता गेल्या 15 दिवसांपासून हे एटीएम बंद आहे. एटीएम सतत सुरू ठेवावे, त्‍यात पैशाचा भरणा करावा, अशी मागणी गावकरी करत आहेत.

रायपूरला राष्ट्रीयीकृत एकमेव बँक असून, याच सेंट्रल बँकेत आसपासच्‍या जवळपास 10 ते 12 गावांचा व्‍यवहार असतो. मात्र एटीएममध्ये पैसे राहत नसल्याची त्‍यांची अडचण होऊन जाते. या एटीएमबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही ग्रामस्‍थांनी तक्रारीही केल्या आहेत. मात्र परिस्‍थिती जैसे थे आहे.