या पण पैसे मिळेलच गॅरंटी नाही…
जलंब (संतोष देठे पाटील) ः माटरगाव येथे दोन एटीएम मशीन आहेत. परंतु त्या एटीएममध्ये पैसे असतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे ऐन अडचणीवेळी नागरिकांची पंचाईत होते. माटरगावला लागून पंधरा ते वीस खेडे येतात रात्री-बेरात्री कुणाला काही दवाखान्याचे काम पडले तर एटीएममध्ये पैसे नसले तर रुग्णांना मोठी दिक्कत सोसावी लागते. काल 25 जानेवारीला दोन्ही एटीएममध्ये पैसे नव्हते. …
Jan 26, 2021, 20:57 IST
जलंब (संतोष देठे पाटील) ः माटरगाव येथे दोन एटीएम मशीन आहेत. परंतु त्या एटीएममध्ये पैसे असतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे ऐन अडचणीवेळी नागरिकांची पंचाईत होते. माटरगावला लागून पंधरा ते वीस खेडे येतात रात्री-बेरात्री कुणाला काही दवाखान्याचे काम पडले तर एटीएममध्ये पैसे नसले तर रुग्णांना मोठी दिक्कत सोसावी लागते. काल 25 जानेवारीला दोन्ही एटीएममध्ये पैसे नव्हते. त्यातच दुसर्या दिवशी बँकेला सुटी असल्याने पैसे भरण्याची शक्यता कमीच. त्यामुळे आजही ग्राहकांचे हाल झाले. संबंधित यंत्रणेने एटीएममध्ये पुरेशी रोख ठेवावी, अशी मागणी बँक ग्राहक करत आहेत.