बनमेरू विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय लोणार विज्ञान महोत्सव

लोणार (प्रेम.सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार येथील कै कु. दुर्गा बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व विमुक्त फाऊंडेशन पुणे यांच्या सहकार्याने 25 फेब्रुवारीला चौथे राज्यस्तरीय लोणार विज्ञान महोत्सव ऑनलाइन उत्साहात पार पडला. महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिन व लोणार सरोवराचे संवर्धन या उद्देशाने …
 

लोणार (प्रेम.सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार येथील कै कु. दुर्गा बनमेरू विज्ञान महाविद्यालय व कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व विमुक्त फाऊंडेशन पुणे यांच्या सहकार्याने 25 फेब्रुवारीला चौथे राज्यस्तरीय लोणार विज्ञान महोत्सव ऑनलाइन उत्साहात पार पडला. महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिन व लोणार सरोवराचे संवर्धन या उद्देशाने करण्यात आले होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी केले व महोत्सवाच्‍या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला.
महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. संजय ढोले (सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) यांनी लोणार सरोवरात अजून संशोधन होणे आवश्यक असून, लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आपले योगदान आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर डॉ.काकासाहेब मोहीते (प्राचार्य सी. टि. बोरा महाविद्यालय शिरुर व माजी सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) यांनी विज्ञानयुगातील सुवर्ण दशक यावर भाष्य करताना या कालावधीत लागलेले महत्त्वाचे शोध बदल माहिती सादर केली. महोत्सवाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू स्वा.रा. ति. म. वि नांदेड) यांनी हा‌ महोत्सव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आशावाद व्यक्त केला. विज्ञान- तंत्रज्ञानाचा विकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. महोत्सवात चित्रकला, रांगोळी स्पर्धा ( विषय -आपल्या कल्पनेतील लोणार सरोवर) निबंध स्पर्धा (विषय- लोणार सरोवराचा विकास आराखडा) आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महोत्सवाचे समन्वयक म्‍हणून प्रा. कमलाकर क. वाव्हळ‌‌ यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. सौरभ प. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख अतिथींची ओळख प्रा. डॉ. सूर्यकांत बोरूळ व प्रा. डॉ. महेंद्र भिसे यांनी केले.