पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 आहे. टँकरद्वारे या गावाला रोज 17 हजार 200 लीटर्स पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार या गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात …
Feb 17, 2021, 19:09 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 आहे. टँकरद्वारे या गावाला रोज 17 हजार 200 लीटर्स पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार या गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.