नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती बांधून आंदोलन, …तर 2 मेपासून संपावर
लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज, 1 एप्रिलला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नगरपालिका तसेच नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या मागण्यांचा पाठपुरावा राज्य संघटनेकडून वेळोवेळी करूनही शासन गंभीर नाही. त्यामुळे आज सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती …
Apr 1, 2021, 21:57 IST
लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज, 1 एप्रिलला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नगरपालिका तसेच नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या मागण्यांचा पाठपुरावा राज्य संघटनेकडून वेळोवेळी करूनही शासन गंभीर नाही. त्यामुळे आज सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. पुढच्या टप्प्यात १५ एप्रिलला लेखन बंद आंदोलन व २ मेपासून सर्वच कर्मचारी संपावर जाणार आहेत.