देऊळगाव राजात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा आक्रोश; मनोज कायंदे यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाला निवेदन
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलचे प्रति लिटर दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. या वेगाने महागाई वाढत राहिल्यास डिझेलचेही प्रतिलिटर दर 100 रुपये पार जाण्याची शक्यता आहे. या महागाईचा विरोध करत मोदी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध देऊळगाव येथे काँग्रेसतर्फे …
Mar 8, 2021, 22:24 IST
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलचे प्रति लिटर दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. या वेगाने महागाई वाढत राहिल्यास डिझेलचेही प्रतिलिटर दर 100 रुपये पार जाण्याची शक्यता आहे. या महागाईचा विरोध करत मोदी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध देऊळगाव येथे काँग्रेसतर्फे करण्यात आला. देऊळगाव राजा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यासाठी रमेश कायंदे, दिलीप सानप, रफिक भाई, हनिफ शहा,अतिष कासारे,आयुब भाई यांची उपस्थिती होती.