डोलारखेडचे ग्रामस्थ म्हणतात, महावितरण मोठ्या अपघाताची वाट पाहतेय का?
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोलारखेड येथे बर्याच दिवसांपासून महावितरणच्या तारा एका बाभळीच्या झाडांमध्ये अडकलेल्या आहेत. या झाडाखालीच पिण्याच्या पाण्याचा हातपंप आहे. याठिकाणी पाणी भरण्यासाठी नेहमी वर्दळ असते. झाड कोसळले तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातही बर्याच ठिकाणी तारा सैल झालेल्या असून, शॉर्टसर्किट होण्याची भीती आहे. महावितरणच्या नांदुरा …
Jan 7, 2021, 03:30 IST
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोलारखेड येथे बर्याच दिवसांपासून महावितरणच्या तारा एका बाभळीच्या झाडांमध्ये अडकलेल्या आहेत. या झाडाखालीच पिण्याच्या पाण्याचा हातपंप आहे. याठिकाणी पाणी भरण्यासाठी नेहमी वर्दळ असते. झाड कोसळले तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातही बर्याच ठिकाणी तारा सैल झालेल्या असून, शॉर्टसर्किट होण्याची भीती आहे. महावितरणच्या नांदुरा उपविभागाचे कार्यकारी अभियंता याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. ते मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का? वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेऊन विद्युत तारा दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी डोलारखेड येथील ग्रामस्थ करत आहेत.