डोंगरखंडाळा, चौथा, देव्‍हारीसाठी पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, चौथा व देव्हारी या तीन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांना पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. डोंगरखंडाळा येथील 8630 लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर गावाला रोज 2 लक्ष 2 हजार 600 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. देव्हारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, चौथा व देव्हारी या तीन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांना पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.

डोंगरखंडाळा येथील 8630 लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर गावाला रोज 2 लक्ष 2 हजार 600 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. देव्हारी येथील 649 लोकसंख्येसाठी एक टँकर 35 हजार 580 लिटर, चौथा येथील 2000 लोकसंख्येकरिता एक टँकर 52 हजार 440 लीटर पाणी पुरवठा करणार आहे.  टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निविदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा यांनी कळविले आहे.