जिल्ह्याच्या डाक विभागात भरणार 56 पदे भरती; 26 मे अर्जाची अंतिम मुदत
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः भारतीय डाक विभागात जीडीएस ब्रँच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर, डाकसेवक या पदांची ऑनलाइन भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या कार्यालयातंर्गत जिल्ह्यात 56 पदांची भरती होणार आहे. या पदांविषयी माहिती, नियम व अटी https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज …
May 11, 2021, 15:09 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः भारतीय डाक विभागात जीडीएस ब्रँच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर, डाकसेवक या पदांची ऑनलाइन भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या कार्यालयातंर्गत जिल्ह्यात 56 पदांची भरती होणार आहे. या पदांविषयी माहिती, नियम व अटी https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज अपलोड करण्याची अंतिम मुदत 26 मे 2021 आहे, असे अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.