ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरळीत सुरू करा; ‘मनविसे’ची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना साथरोगामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे-येणे बंद होते. आता संपूर्ण जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये सुरू झाली असून ग्रामीण भागातील एसटी बसेस बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस सेवा सुरळीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदन पाठवून एसटीच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना साथरोगामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे-येणे बंद होते. आता संपूर्ण जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये सुरू झाली असून ग्रामीण भागातील एसटी बसेस बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस सेवा सुरळीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदन पाठवून एसटीच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे, माजी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ, जिल्हा सचिव राहुल चोपडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कर, अतिशराजे जाधव, शुभराज डंबेलकर, सौरव तायडे, शिवशंकर ढोकणे, पवनराजे जाधव आदींच्या सह्या आहेत.