आमदार श्वेताताई महाले यांच्‍या वाढदिवसानिमित्त लोणारमध्ये मास्‍क, सॅनिटायझरचे वाटप

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या लोणार शाखेतर्फे ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळेही वाटप करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे, जिल्हा नेते विजूभाऊ मापारी, भगवानराव सानप, तालुका …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखलीच्‍या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्‍या लोणार शाखेतर्फे ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळेही वाटप करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्‍या तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे, जिल्हा नेते विजूभाऊ मापारी, भगवानराव सानप, तालुका सरचिटणीस प्रकाश नागरे, जिल्‍हा सदस्य शिवाजी सानप, सुंदर संचेती, तालुका उपाध्यक्ष संजय बुरकुल, सुरेश अंभोरे युवा कार्यकर्ते अजय खाडे, एकनाथ टेकाळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.