आडगावराजा ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार प्रदान

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्व.आर.आर.पाटील आबा तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार काल, 16 फेब्रुवारीला तालुक्यातील आडगाव राजा ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. पाटील आबा तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे व ग्रामसेवक अशोक ठाकरे यांनी पुरस्कार स्वीकारला.आडगावराजा हे गाव चुलमुक्त, …
 

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्व.आर.आर.पाटील आबा  तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार काल, 16 फेब्रुवारीला तालुक्‍यातील आडगाव राजा ग्रामपंचायतीला स्‍व. आर. आर. पाटील आबा  तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे व ग्रामसेवक अशोक ठाकरे यांनी पुरस्‍कार स्‍वीकारला.आडगावराजा हे गाव चुलमुक्त, पाणंदमुक्‍त, पर्यावरणयुक्त , स्वच्छ सुंदर गाव  आहे. यासह अनेक उपक्रम गावकरी मंडळी ग्रामपंचायतच्या सहकार्याने राबवतात. सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे, उपसरपंच सरस्वती भगवान चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनुने , सुभाषराजे जाधव , गजानन राजे जाधव, अलका मिलिंद कहाळे, संगिता सुखदेव काळे, सरिता प्रकाश सोनुने , लक्ष्मीबाई भागाजी डोंगरे, सुमन मधुकर चव्हाण आदींच्‍या मार्गदर्शनात  ग्रमपंचायतीने स्मार्ट गाव होण्यासाठी प्रयत्‍न केले.