जोडधंदा करायचायं? मग ही बातमी तुमच्यासाठी! "दुधाळ जनावरे, शेळी-मेंढ्या, कुक्कुट पक्षी घेण्यासाठी सुवर्णसंधी!२ जूनपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!संपूर्ण प्रोसेस काय? वाचा...
Updated: May 8, 2025, 09:17 IST
बुलडाण(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गावागावातल्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरे, शेळी-मेंढ्या व कुक्कुट पक्षी वाटपाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर २ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अमितकुमार दुबे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तृप्ती पाटील (खेडेकर) यांनी केले आहे.
या सेवा उपलब्ध...
- दुधाळ गायी व म्हशींचे वाटप.
- शेळी-मेंढी गट वाटप योजना.
- १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेडसाठी अनुदान.
- १०० कुक्कुट पिलांचे वाटप.
ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ३ मे पासून सुरू झाली असून २ जून ही अंतिम मुदत आहे. अर्ज भरताना आपला मोबाईल क्रमांक बरोबर द्यावा, कारण त्यावरच अर्जाची स्थिती कळवण्यात येणार आहे. २५ ते २७ जून दरम्यान कागदपत्रांतील त्रुटी सुधारण्याची संधी दिली जाणार असून २ जुलै रोजी अंतिम पात्र लाभार्थी यादी जाहीर केली जाईल. अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या https://ah.mahabms.co अथवा मोबाईल ॲप: AH-MAHABMS गुगल पे स्टोअर वरून डाउनलोड करा.