'अवकाळी'मुळे कृषि क्षेत्राला जबर तडाखा! शंभर कोटींचे नुकसान, दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी बाधित! पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

 

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या 'अवकाळी'मुळे जिल्ह्याच्या कृषि क्षेत्राला जबर तडाखा बसला असून तब्बल शंभर कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २ लाख १३ हजार शेतकरी बाधित असून १ लाख ६ हजार ८०८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि ३) सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील गावांतील नुकसानीची पाहणी केली. यानंतर सिंदखेडराजा येथे पार पडलेल्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी ही भयावह आकडेवारी सामोरे आली.

 २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान झालेल्या वादळीअतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना निकषाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याची ग्वाही वळसे पाटील यांनी दिली. सिंदखेडराजा येथील जिजामाता सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेंद्र शिंगणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, राष्ट्रवादीचे (अजितदादा) जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, उपस्थित होते. वळसे पाटील यांनी अधिकाऱ्याकडून नुकसानीची माहिती घेतली. मदतीतून कोणीही शेतकरी सुटता कामा नये , असे पंचनामे करा असे आदेश त्यांनी दिले. ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे दोन दिवसांमध्ये पूर्ण होतील. त्यामुळ नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नेटशेड चे प्रामुख्याने सिंदखेड राजा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे नेट सेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलून नेट-सेट कंपन्यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्याची हमी दिली आहे लवकरच नेट सेट साठी विमा उतरण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. येलो मोझक मुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यालाही शासन मदत करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
                  जाहिरात👆
जिल्ह्यातील एकूण ९० पैकी ३४ महसूल मंडळ जास्त बाधित झाले आहेत. २१२४०६ शेतकऱ्यांचे १०६८०८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. १,४४,५७७ बाधित शेतकऱ्यांचे ८१०५७ हेक्टर शेतीचे पंचनामे अंतिम करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बिजोत्पादन क्षेत्रावरील ३८४१ शेडनेटचे नुकसान झाले आहे.