...म्हणून जिल्ह्यातील ९४ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम सन्मान निधी! शेतकऱ्यांनो 'ही' चूक करू नका, प्रशासनाचे आवाहन.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ईकेवायसी नसल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ९४ हजार शेतकरी पिएम किसान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी तसेच अन्य योजनांचा लाभ मिळविण्यासाठी देखील अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तातडीने ईकेवायसी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
     ई- केवायसी पूर्ण केल्याशिवाय विविध योजनांच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ८२४ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यातील ८ लाख २४ हजार ८२४ शेतकऱ्यांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय विविध योजनेद्वारे ७ लाख १६ हजार ८३९ शेतकऱ्यांना लाभाचे वाटप झाले आहे. मात्र , ९४ हजार ६२८ शेतकऱ्यांनी ईकेवायसी नसल्याने त्यांना लाभाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे. तातडीने शेतकऱ्यांनी ईकेवायसी करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.