बुलढाणा तालुक्यातल्या गाव गाड्याचे राजकारण तापणार! लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुकी! १० जून आणि ११ जून तारीख महत्वाची....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयीन निर्णयामुळे प्रलंबित आहेत. त्या केव्हा होतील याचा निश्चित नेम नाही..मात्र आता त्या आधीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागू शकतात अशी स्थिती आहे.. बुलढाणा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यासाठी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

नियोजित कार्यक्रमानुसार आरक्षण सुरतीचा कार्यक्रम हा १० व ११ जून रोजी होणार आहे. त्या त्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये या आरक्षण सोडती होणार आहेत. सकाळी ९ वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू होईल, ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीच्या सभेला तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाणा तहसीलदारांनी केले आहे. 

 दि. १० जून २०२६ रोजी सावळी, जनुना, बिरसिंगपूर, डोमरूळ, केसापूर, बोरखेड, रुईखेड टेकाळे, कोलवड, देवपूर, जांब, भादोला, अजिसपूर, भडगाव, म्हसला बु., सिंदखेड, पळसखेड भट, धामणगाव, मद, तांदूळवाडी, देऊळघाट, माळवंडी, रायपूर, कुंबेफळ, जामठी, धाड, चांडोळ आणि शिरपूर या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत होणार आहे.

तर दि. ११ जून २०२६ रोजी वरुड, दहिद बु., पळसखेड नाईक, तराडखेड, डोंगरखंडाळा, कुलमखेड, दुधा, वरवंड, साखळी बु., खुपगाव, सागवन, मातला, पांग्री, सोयगाव, चौथा, पाडळी, अंभोडा, नांद्राकोळी, दहिद खु., गुम्मी, हतेडी बु., सातगाव, मासरुळ आणि माळविहीर या ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.