मराठा आंदोलनाचा फटका! तीन दिवसांत एसटी महामंडळाला १२ लाखांचा तोटा; तोडफोडीच्या भीतीने बुलडाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या बहुतांश बसफेऱ्या रद्द...
Nov 1, 2023, 20:05 IST
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा राज्यभर वणवा पेटला आहे. बीड ,जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत हिंसाचाराच्या घटना समोर आल्यात. सरकारने जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. दरम्यान हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बुलडाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे..
गेल्या ३ दिवसांपासून जवळपास २०० फेऱ्या बंद करण्यात आल्या असून जवळपास १२ लाखांचा तोटा या तीन दिवसांत सहन करावा लागला लागल्याचे वृत्त आहे . कुठल्याही आंदोलनात आंदोलक एसटी बसेसलाच पहिले लक्ष करतात. मराठवाड्यात काही ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड केल्यामुळे खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या. ३० व ३१ ऑक्टोबर या दोन दिवसांत जवळपास १५० फेऱ्या रद्द केल्याने ८ लाखांचा तोटा सहन करावा लागला. त्यात १ नोव्हेंबरच्या तोट्याची भर पडल्यास तो आकडा १२ लाखांच्या आसपास आहे..