मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणे झाले अतिशय सोपे..! घरच्या घरी भरा अर्ज; कसा ते बातमीत वाचा....
Aug 1, 2024, 20:22 IST
बुलडाणा( जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना अर्ज करणे सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दि. १ ऑगस्ट २०२४ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी नारीशक्तीदूत ॲपवर अर्ज भरले आहेत, त्यांना या पोर्टलवर पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नसल्यास त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.