अहो ऐकलं का..धार्मिक कार्यासाठी गंगोत्रीवरून आणलेले गंगाजल मिळणार आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये! किंमत फक्त...
Sep 10, 2024, 17:09 IST
बुलडाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डाक विभागामार्फत धार्मिक कार्यात,सणवारामध्ये उपयुक्त असे पवित्र गंगाजल आपल्या डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. डाक विभागामार्फत खास गंगोत्री येथून सदर गंगाजल व्यवस्था केली जाते. गंगाजल फक्त रु.३५ रुपये प्रती बॉटल (२०० मीली) प्रमाणे बुलडाणा आणि खामगाव मुख्य डाक घर येथे उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी डाक विभागाच्या या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. डाक अधीक्षक, गणेश अंभोरे, बुलडाणा विभाग, बुलडाणा यांनी केले आहे.