पालकमंत्री मकरंद पाटील यांचा दोन दिवसीय बुलडाणा जिल्हा दौरा; ३० एप्रिल व १ मे रोजी विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे बुधवार, ३० एप्रिल आणि गुरुवार, १ मे २०२५ रोजी दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

जागरूक रहा
पालकमंत्री पाटील यांचे ३० एप्रिल रोजी मुंबईहून बुलडाणा येथे आगमन होईल आणि त्याच दिवशी मुक्काम असणार आहे. त्यानंतर गुरुवार, १ मे रोजी विविध नियोजित कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून, कार्यक्रमांनंतर दुपारी २ वाजता त्यांचा मुंबईकडे प्रयाण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.