BREAKING २४ तासांत पुन्हा बदलले बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी! शुभम गुप्ता नवे सीईओ
Mar 20, 2024, 17:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २४ तासांत बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलण्यात आले आहेत. काल रात्री विशाल नरवाडे यांची बदली करून त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याला २४ तास उलटत नाही तोच राज्य सरकारने त्यात अशंत: बदल करून शुभम गुप्ता यांची बुलडाणा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
Add.👆
आज २० मार्चला सामान्य प्रशासन विभागाने त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. आदेशावर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नितीन गद्रे यांची स्वाक्षरी आहे. हा तडकाफडकी बदल का केला? याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.