जिल्ह्यातील बंजारा समाजाला नवी दिशा! जिजाताई राठोड-चांदेकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड! 
समाजहितासाठी कार्य करणाऱ्या जिजाताईंचा राष्ट्रीय स्तरावर गौरव..

 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जिजाताई राठोड-चांदेकर यांची राष्ट्रीय बंजारा परिषदच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. समाजसेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे निरंतर कार्यरत असलेल्या जिजाताईंच्या कार्याचा हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. त्यांच्या निवडीमुळे बंजारा समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या कार्यात कार्यरत असलेल्या जिजाताईंनी महिला, बालक, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदचे संपादक आणि धर्मनेते किसन भाऊ राठोड, प्रदेशाध्यक्ष सीमाताई राठोड, कार्याध्यक्ष निर्मलाताई जाधव आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव उमेश भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. समाजात जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाज संघटन मजबूत करण्यासाठी जिजाताईंवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीने बंजारा समाजात आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही निवड बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.