सिंदखेड राजा बसस्थानक परिसरात महिलेसोबत वाईट घडलं! संपूर्ण प्रकरण वाचा! 

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील बसस्थानकात १८ जानेवारीच्या दुपारी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञाताने चोरले. दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बटाळा गावातील कांताबाई कंकाळ मावशीला भेटण्यासाठी सिंदखेडराजा येथे आल्या, घरी परत जात असताना बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र (१५ हजार किमतीचे) पळविले.
जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. चिखलीतील प्रियंका ज्वेलर्स येथे एका महिलांच्या टोळक्याने चोरी केली होती. त्या गुन्ह्यातील आरोपी महिला काल पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढले असून सोन्याची दागिने चोरण्याचे प्रमाण सर्वाधिक झाले आहे. सिंदखेड राजा बस स्थानकात झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल अनील खार्डे करत आहेत.