आमदार श्वेताताईंची "अशी" दिवाळी! शेतकऱ्यांना म्हणाल्या...
राज्यातील निष्क्रिय सरकार जाऊन जनतेच्या आशीर्वादाने सक्रिय सरकारची स्थापना झाली आहे. हे सरकार घरात बसणारे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारे सरकार आहे. एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कर्तबगार मुख्यमंत्री राज्याला लाभलेले आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली असून नुकसान भरपाईच्या निकषात मोठी वाढ केली आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ६८०० वरून १३६०० तर बागायत पिकांसाठी हेक्टरी २७००० व ३ हेक्टरी मर्यादा केली. बहुवार्षिक पिकांसाठी १८००० रुपयांवरून ३६००० प्रती हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. राज्यातील आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. त्यामुळे संकटांना डगमगून आत्महत्या करणे हा त्यावरचा उपाय नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहन आमदार श्वेताताईंनी केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, अंकुशराव पाटील, वीरेंद्र वानखेडे, शिवराज पाटील, विजय नकवाल, सुनील पोफळे, नीरज गायकवाड, अक्षय आदमाने यांच्यासह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.