…म्‍हणून श्वेताताईंनी मानले पालकमंत्र्यांचे आभार!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात ९० लक्ष रुपये किमतीच्या ऑक्सिजन प्लांटला मान्यता मिळाल्याने आमदार श्वेताताई महाले यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार श्वेताताई महाले यांच्या सेवालय या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी आमदार महाले पाटील यांच्या मागणीच्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात ९० लक्ष रुपये किमतीच्या ऑक्सिजन प्लांटला मान्यता मिळाल्याने आमदार श्वेताताई महाले यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार श्वेताताई महाले यांच्‍या सेवालय या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी आमदार महाले पाटील यांच्‍या मागणीच्या अनुषंगाने कोविड हेल्थ सेंटर तसेच ऑक्सिजन प्लांटला मान्यता दिल्याने आ. महाले पाटील यांनी यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

२ ऑगस्टला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी ऑक्सिजन मिळत नसल्याने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी २२ जूनला पालकमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड हेल्थ सेंटरला सुद्धा आमदार श्वेताताई महाले यांचे प्रयत्नानेच मान्यता मिळालेली असून उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीची दुरुस्ती करून त्याठिकाणी कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार होते. त्याच ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये याकरिता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन प्लांटला सुद्धा मान्यता देण्याची मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी त्यावेळी केली होती. त्या अनुषंगाने आ. महाले यांच्‍या प्रयत्नाने कोविड हेल्थ सेंटर आणि ऑक्सिजन प्लांट या दोन्ही कामांना मान्यता मिळाल्याने चिखली शहराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दोनही कामे मैलाचा दगड ठरणार आहेत.

रोज ८० जंबो सिलिंडर्सची निर्मिती
चिखली येथे बसविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा ४०० एलपीएम क्षमतेचा असून यातून रोज ८० जंबो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. होणारी ऑक्सिजन निर्मिती ही हवेतून होणार असल्याने किरकोळ खर्चातून रोज मोठ्या प्रमाणात मोफत प्राणवायू मिळून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.