हुर्रेऽऽ ग्रामपंचायत निवडणुकांच्या धामधुमीत 9 पालिका सभापती निवडणुकांचा मुहूर्त जाहीर!; आचारसंहितामुळे पुढे ढकलली होती निवड, संक्रांतीला इच्छुकांचे तोंड झाले गोड

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दैनंदिन जीवनाप्रमाणे राजकारणात देखील संयोगाला स्थान आहे असे म्हणता येईल! ज्या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील 9 नगरपालिका सभापती पदाची निवडणूक पुढे ढकलली होती. त्याच ग्रामपंचायत निवडणुकांच्या समारोपात पालिका निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झालाय! येत्या 21 जानेवारीला या निवडणुका होणार असून, मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर घोषणा झाल्याने जीव टांगणीला लागलेल्या व …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दैनंदिन जीवनाप्रमाणे राजकारणात देखील संयोगाला स्थान आहे असे म्हणता येईल! ज्या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील 9 नगरपालिका सभापती पदाची निवडणूक पुढे ढकलली होती. त्याच ग्रामपंचायत निवडणुकांच्या समारोपात पालिका निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झालाय! येत्या 21 जानेवारीला या निवडणुका होणार असून, मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर घोषणा झाल्याने जीव टांगणीला लागलेल्या व इच्छुक पालिका सदस्यांचे तोंड खर्‍या अर्थाने गोड झाले आहे.

21 तारखेला सकाळी 11 वाजता यासाठी संबंधित पालिकेत विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, मलकापूर, जळगाव, खामगाव, शेगाव, मेहकर व नांदुरा पालिका वर्तुळातील राजकारण पुन्हा तापणार आहे. बहुमताच्या आधारे नामनिर्देशन करून सभापती व स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात येत असली तरी ही एक प्रकारे निवडणूकच ठरते. यामुळे या मानाच्या पदासाठी आजपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. घोषित कार्यक्रमानुसार सभेच्या प्रारंभी अर्थ बांधकाम, आरोग्य, महिला, पाणी पुरवठा, शिक्षण आदी समित्यांचे सभापती निवडले जातील. यानंतर स्थायी समितीचे गठन करण्यात येणार आहे. राजकारणाला वेग, इच्छुकांची नव्याने फिल्डिंग! दरम्यान 3 दिवसांपासून निवडणुकीची फाईल सहिसाठी अडकल्याने शेकडो इच्छुकांच्या दिल की धडकन तेज झाली होती. अखेर आज मोठ्या सायबांची सही झाल्याने व कार्यक्रम लागल्याने 9 पालिका वर्तुळातील राजकीय हालचालींना गती आली आहे. एरवी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या या निवडी तीनेक आठवडे लांबल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे संक्रांतीला मेंबर लोकांचे तोंड निवडणूक कार्यक्रमरुपी तीळ- गुळाने गोड झाले आहे. यामुळे इच्छुकांनी आता नव्याने भाऊ, दादा, ताईंकडे नव्याने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.