सिंदखेड राजाच्या उपनगराध्यक्षांची तलवार म्यान!; पदाचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती; पण ‘हे’ दोन चेहरे प्रबळ दावेदार!!
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अपुरे संख्याबळ पाठिशी असल्याने अखेर सिंदखेड राजाच्या उपनगराध्यक्षा सौ. नंदाताई विष्णू मेहेत्रे यांनी आज, 7 जूनला पदाचा राजीनामा दिला. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी राजीनामा स्वीकारला. दरम्यान, नवा उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यातील दोन नावांची दावेदारी प्रबळ मानली जात असून, शेख अजीम आणि गणेश झोरे ही ती दोन नावे आहेत. कुणाच्या गळ्यात साहेब उपनगराध्यक्षपदाची माळ घालतात, याचीच उत्सुकता सर्वांना आहे.
नगरपालिकेत एकूण 17 नगरसेवक असून, त्यात शिवसेनेचे 7, राष्ट्रवादीचे 8, भारतीय जनता पक्षाचे 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी अविश्वास प्रस्ताव चर्चा करण्यासाठी सभा बोलावण्याआधीच संख्याबळ पाठिशी नसल्याचे लक्षात आल्याने सौ. मेहेत्रे यांनी राजीनामा दिला. नगरसेवक भीमा पंडित जाधव, राजेश एकनाथ आढाव, सौ. दीपाली योगेश म्हस्के, भिवसन एकनाथ ठाकरे, बालाजी नारायण मेहेत्रे, सुमन प्रकाश खरात, सौ. ज्योती बाळू म्हस्के, सौ. रूख्मन राधाजी तायडे, चंद्रकला मंजाजी तायडे, गणेश शिवाजी झोरे, राजेश दत्तूआप्पा बोंद्रे, सौ. हजरा काझी शेख, अजीम गफार, बबन साहेबराव म्हस्के, सौ. सारिका श्याम मेहेत्रे यांनी सौ. नंदाताई मेहेत्रे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सौ. मेहेत्रे उपनगराध्यक्ष होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये दोन वर्षे त्या नगराध्यक्ष होत्या. ”मी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करणार आहे. अपुरे संख्याबळ असल्यामुळे मी अविश्वास ठरावाला सामोरे न जाता पदाचा राजीनामा देत आहे”, असे सौ. नंदाताई मेहेत्रे यांनी म्हटले आहे.
2019 साली सिंदखेड राजा नगरपरिषदेची निवडणूक झाली होती. ही निवडणूक शिवसेना-भाजपाने युती करून लढवली होती. जागा वाटप व पद वाटप दोन्ही पक्षांनी समान करून घेतले. नगराध्यक्षपद शिवसेनेला तर उपनगराध्यक्षपद भाजपाला राहील, असे ठरले होते. मात्र दोन वर्षांनंतर शिवसेनेने भाजपाच्या उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला. या प्रस्तावाविरोधात न्यायालयात दाद मागू, असा उपनगराध्यक्षांनी घेतला होता. मात्र आता त्यांनीच राजीनामा दिल्याने लढाईआधी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी पुन्हा…
राज्याप्रमाणे सिंदखेड राजा नगरपालिकेत सुद्धा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस याची युती होऊन महाविकास आघाडीला उपाध्यक्ष पद मिळावे यासाठी 15 नगरसेवक एकवटले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली काही महिन्यांपासून सुरू होत्या. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बैठकही घेतली होती. त्यानंतर उपनगराध्यक्षपद आपल्याकडे घेण्याचा ठाम निर्धार या पक्षांनी केला आणि त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या. अविश्वास प्रस्ताव आणून हे पद राष्ट्रवादीच्या पदरात पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व नगरसेवकांची बैठक आज मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे