सिंदखेड राजा पंचायत समिती सभापतीपदी मीनाताई बंगाळे बिनविरोध

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा पंचायत समिती सभापतीपदी मीनाताई बंगाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 15 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली. यापूर्वी नंदिनी देशमुख सभापती होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागेचे समसमान वाटप ठरल्याने उर्वरित काळासाठी आता मीनाताई बंगाळे सभापती राहणार आहेत. सकाळी 11 वाजता …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा पंचायत समिती सभापतीपदी मीनाताई बंगाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 15 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली. यापूर्वी नंदिनी देशमुख सभापती होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागेचे समसमान वाटप ठरल्याने उर्वरित काळासाठी आता मीनाताई बंगाळे सभापती राहणार आहेत.

सकाळी 11 वाजता पीठासीन अधिकारी तहसीलदार सुनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवड प्रक्रियेची सभा सुरू झाली. यावेळी नायब तहसीलदार प्रविण लटके, गट विकास अधिकारी देव घुनावत यांची उपस्‍थिती होती. सौ. मीना गजानन बंगाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या नियुक्तीनंतर मीनाताई बंगाळे यांचा राष्ट्रवादी पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, दिनकरराव देशमुख, रामभाऊ जाधव, विलास देशमुख, जगन सहाने, शिवप्रसाद ठाकरे, बद्रीनाथ बोडखे, मनोहर गव्हाड, प्रल्हाद जाधव, पंचायत समितीचे सदस्य राजेश ठोके, सौ. नंदिनी देशमुख, सौ. लता खरात, नाथाभाऊ दराडे, सौ. अश्विनी बोडखे, शेख शफी शेख गुलाब हजर होते.