संग्रामपूर पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या रत्‍नप्रभा धर्माळ बिनविरोध

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रकिया आज, 3 मार्च रोजी पंचायत समितीत पार पडली. या वेळी भाजपाच्या रत्नप्रभा धर्माळ यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी तेजश्री कोरे, सहाय्यक गटविकास अधिकाटी सी. पी. उंदरे, निवडणूक विभागाचे संदीप दाभाडे, पंचायत समिती कर्मचारी विवेक इधोकार यांनी निवडणुकीचे …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रकिया आज, 3 मार्च रोजी पंचायत समितीत पार पडली. या वेळी भाजपाच्‍या रत्नप्रभा धर्माळ यांची बिनविरोध निवड झाली.

तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी तेजश्री कोरे, सहाय्यक गटविकास अधिकाटी सी. पी. उंदरे, निवडणूक विभागाचे संदीप दाभाडे, पंचायत समिती कर्मचारी विवेक इधोकार यांनी निवडणुकीचे काम पाहिले. रत्‍नप्रभा धर्माळ यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. निवड जाहीर होताच  पंचायत समिती परिसरात फटाके फोडून जल्लोष करण्यातआला. सभेसाठी सर्व 8 सदस्य हजर होते. संग्रामपूर पंचायत समितीत भाजपाचे वर्चस्व आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी, जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख, माजी बाजार समिती सभापती गजानन दाणे, पं. स. उपसभापती अंबादास चव्हाण, डॉ. गणेश दातीर, भारत वाघ, ज्ञानदेव भारसाकळे, रामदास म्हसाळ, नारायण अवचार,अविनाश धर्माळ आदी उपस्‍थित होते.