शेतकरी संघटना वेगळ्या विदर्भाचे आंदोलन तापवणार!; चिखलीत रास्‍ता रोकोतून “या’ दोन नेत्‍यांना गावबंदीचा इशारा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आज, २६ ऑगस्टला चिखली येथील खामगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांना गावबंदी करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी दिला. विदर्भाच्या नावावर निवडणुका लढवून देवेंद्र फडणवीसांनी सत्तेची फळे चाखली तर कोरोना काळात विदर्भातील जनतेचे वीजबिल व १०० युनिट मोफत देण्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आज, २६ ऑगस्‍टला चिखली येथील खामगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांना गावबंदी करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी दिला.

विदर्भाच्या नावावर निवडणुका लढवून देवेंद्र फडणवीसांनी सत्तेची फळे चाखली तर कोरोना काळात विदर्भातील जनतेचे वीजबिल व १०० युनिट मोफत देण्याची घोषणा करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना गावबंदी करणार असल्याचा इशारा कणखर यांनी दिला. विदर्भाच्या शेतकऱ्यांवर राज्यकर्त्यांच्या अन्यायाने कळस गाठला आहे. कुत्र्या मांजरा सारखे मेल्यापेक्षा संघर्ष करून मेलेले काय वाईट, असेही कणखर म्हणाले. यावेळी खामगाव चौफुलीवर चिखली पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष समाधान कणखर, एकनाथ थुट्टे, प्रकाश घुबे, नरेंद्र घेडकर, भानुदास घुबे, विलास मुजमुले, धोंडू सोळंकी, राजू शेटे, जगन्‍नाथ लोखंडे, भिकाजी सोळंके, ज्ञानेश्वर सोळंकी, विठोबा थुट्टे, शंकर पैठणे, ज्ञानदेव थुट्टे, विजय घुबे, शेषराव शेळके, रामदास शेळके, बबन कदम, जनार्धन अनपट, रामेश्वर जाधव, रतिराम शेळके, देविदास भगत, गणेश लेंडे, राजू थुट्टे, अच्युतराव थुट्टे, मधुकर थुट्टे, नारायण पैठणे, संतोष थुट्टे सहभागी झाले होते.