लोणार तालुक्यात दिग्गजांना धक्का, युवकांना प्राधान्य

लोणार (प्रेम सिंगी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींत दिग्गजांना झटका बसला आहे. युवा उमेदवारांना ग्रामस्थांनी प्राधान्य दिले असून, यामुळे कही खुशी कही गम असे वातावरण ग्रामीण भागात दिसून येत आहे. लोणार तालुक्यातील 16 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी 15 जानेवारीला निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. सकाळी 9 ला मतमोजणीस सुरुवात झाली. …
 

लोणार (प्रेम सिंगी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींत दिग्गजांना झटका बसला आहे. युवा उमेदवारांना ग्रामस्थांनी प्राधान्य दिले असून, यामुळे कही खुशी कही गम असे वातावरण ग्रामीण भागात दिसून येत आहे.

लोणार तालुक्यातील 16 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी 15 जानेवारीला निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. सकाळी 9 ला मतमोजणीस सुरुवात झाली.

ग्रामपंचायती आणि विजयी उमेदवार…

फेरी पहिली ः

  • कोयाळी (जागा 9) ः तुकाराम नामदेव दहातोंडे, पुंजाजी सिताराम मानवतकर, जया अंबादास मुळे, वर्षा विजय मुळे, उध्दव कचरू दहातोंडे, किरण महादेव त्रंबके, कल्पना सहदेव दहातोंडे.
  • अंजनीखुर्द (जागा 11) ः विजयचंद्र माणिक अवसरमोल, जया अमोल अवसरमोल, सिंधू प्रभाकर शेळके, प्रशांत प्रल्हाद गायकवाड, दीपक एकनाथ धंदरे, गंगा कैलास गायकवाड, इंदू सुनिल तनपुरे

फेरी दुसरी ः

  • खळेगाव (जागा 9) ः मधुकर आश्रुबा सानप, द्रौपती हनुमान नागरे, उमेश भगवान इंगळे, विश्‍वनाथ किसन सानप, शकुंतला विष्णू नागरे , पुरूषोत्तम नंदकिशोर डोईजड, रमा संतोष सरदार, प्रतीक्षा सुनिल नागरे
  • पिंप्रीखंदारे (जागा 7) ः नंदा सुभाष खंदारे, सविता नरसिंह चौधर, विनोद दत्तात्रय खंदारे, प्रतीक्षा सुनील केंद्रे , बंडू दिनकर उबाळे, कमल अशोक पवार

फेरी तिसरी ः

  • हिरडव (जागा 9) ः जयश्री विजय डोईफोडे, नितीन नंदकिशोर मुंडे, रंजना सुभाष सांगळे, प्रकाश मारोती कांबळे, शीतल विजय चाटसे, सुमित्रा संजय डोईफोडे

फेरी चौथी

  • हिवराखंड (जागा 7) ः हसन छोटू चौधरी, मनिषा मच्छिंद्र जगदाळे, अंबादास सखाराम खंड, दुर्गा नारायण जगदाळे
  • बिबखेड ः सत्यभामा उध्दव मोरे, वनिता राजकुमार वाघमारे, आशा ज्ञानेश्‍वर राठोड, माणिक मातीराम राठोड, ज्योती संजय राठोड, मुकेश तुकाराम चव्हाण, संजय उत्तम राठोड, शशिकला नामदेव चव्हाण
  • गुंधा ः गोविंदा धोंडू राऊत, रतिका आश्रु फुके, अंजना रामेश्‍वर माने, दीपक विठ्ठल मानवतकर, शीला नंदकिशोर इंगळे
  • गोत्रा (जागा 7) ः विजयाबाई गजानन वैद्य, सविता गजानन साबळे, हरिभाऊ कोंडुजी धोत्रे, माधुरी एकनाथ लाखोळे, गोदावरी वैद्य, शत्रुघ्न किसन धोत्रे, निर्मला राजेंद्र चव्हाण
  • सोनुना (जागा 7) ः श्रीहरी पांडुरंग घायाळ, अर्चना उध्दव ढगे, अंजना राजू गवळी

फेरी 5 वी

  • देऊळगाव कुंडपाळ (जागा 9) ः शेषराव हरिभाऊ डोंगरे, पूजा अमोल सरकटे, सतीश शशिकांत राठोड, मंदाबाई परमेश्‍वर राठोड, मीरा संजय राठोड, शोभा विष्णू जायभाये, वैशाली सुनिल नरवाडे
  • पार्डा दराडे ः (जागा 9) ः भगवान कडूजी मापारी, संदीप उध्दव कांबळे, द्रौपता लक्ष्मण दराडे, जयश्री राजेंद्र दराडे, कडुजी देवसिंग राठोड, लिलाबाई मदन सुटे, कुंता सत्यनारायण गायकवाड

फेरी 6 वी

  • पांग्रा डोळे (जागा ः 11) ः बबन श्यामराव डोळे , अर्चना देविदास चाटे, सुमन रामेश्‍वर डोळे, उज्ज्वला राहुल नरवाडे, आशामती शंकर डोळे, रत्नकला प्रशांत डोळे, संतोष मोतीराम गिर्‍हे, जिजाबाई भगवान पाटोळे, समाधान भिमराव चौघुले, अनिता गजानन डोळे, विमल भिमरव पवार
  • हत्ता (जागा ः 7) ः तुळशीराम भिमला राठोड, वनिता प्रमोद जुमडे, लक्ष्मी रामभाऊ पवार, राजू वाच्छु पवार, राधाबाई उत्तम पवार, विनोद जनार्धन गावंडे, अलका दादाराव आनंदे

फेरी 7 वी

  • किनगाव जट्टू (जागा 13) ः अनिल दत्तात्रय राठोड, सुरेश बाबुलाल पवार, प्रतीक्षा शरद गवई, राजेश त्रंबक सानप, अलका गजानन मुर्तडकर, नामदेव देवसिंग जाधव, संगीता गलसिंग राठोड, अनिसखान हमीदखान, मीना राजू शिंगणे, समाधान तुकाराम मुळे, मथुराबाई प्रल्हाद जाधव, शारदाबाई भगवान महाजन

फेरी 8 वी

बिबी ( जागा 13) ः समद सलमान अब्दुल, नंदा दिलीप बनकर, लीलाबाई उत्तम देवकर, दिलीप सिताराम चव्हाण, अनिला संजय खरडे, त्रिवेणी संदीप बनकर, नयना सुनिल इंगळे, पुजा भिकाजी इंगळे, चंदाबाई उत्तम गुलमोहर, गजानन चतुर्भूज इंदोरिया, कुसुम शिवाजी मुळे, भास्कर रामदास खुळे, शशीकला गजानन काकडे

युवकांना संधी

तालुक्यात युवकांना गावाचे कर्तेधर्ते म्हणून निवडण्याकडे ग्रामस्थांना कल राहिला. यासाठी वेळप्रसंगी त्यांनी दिग्गजांना घरी बसवल्याचे चित्र दिसून आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सैफन नदाप, नायब तहसीलदार हेमंत पाटील, दिलीप गोंड यांच्यासह तलाठी, कोतवाल, लिपीक आदींनी मतमोणीसाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.