मोहना खुर्द- रत्नापूर गट ग्रामपंचायत बिनविरोध; शेलगाव देशमुखच्या 8 सदस्यांचेही टेन्शन मिटले!

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द- रत्नापूर गट ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, शिवसेना कार्यालयात नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मेहकर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्यांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी विकास निधीची घोषणा केली होती. त्यानुसार मोहना खुर्द व रत्नापूरवासियांनी एकमत केले. …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द- रत्नापूर गट ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, शिवसेना कार्यालयात नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

मेहकर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्यांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी विकास निधीची घोषणा केली होती. त्यानुसार मोहना खुर्द व रत्नापूरवासियांनी एकमत केले. परिणाम सात जागांसाठी सातच अर्ज शिल्लक राहिले आहेत. नंतर सर्व नवनिर्वाचित उमेदवार व गावकरी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आले. तिथे युवासेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपसभापती सुपाजी पायघन, साहेबराव बोबडे यांनी बिनविरोध विजयी उमेदवार सौ. मंदा शिंदे, सौ. नंदाबाई म. टाले, डिगांबर मेटाने, सौ. सुरेखा प्रमोद वानखेडे, अरुणा समाधान ताकतोडे, सौ. छाया लक्ष्मण मुळे, सौ. किरण संतोष वायाळ यांचा सत्कार केला. यावेळी किसन चोंडकर, गजानन चवरे, भिमराव सरदार, लक्ष्मण मुळे, अशोक शिंदे, रेवती शेळके, प्रमोद वानखेडे, गजानन लाटे, समाधान ताकतोडे, पांडुरंग ताकतोडे, गणेश टाले, विठ्ठल शिंदे, सुधाकर वानखेडे, कैलास मुळे, श्याम जोशी, विलास आखाडे, पिंटू भुंजवटराव हजर होते.

शेलगाव देशमुखमध्ये आठ सदस्य बिनविरोध

मेहकर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या शेलगाव देशमुख येथील निवडणूक 15 जानेवारीला होत असून एकून 13 सदस्य संख्या असलेल्यांपैकी आज 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक 1 मधील 3, वॉर्ड क्रमांक 3 मधील 2 व वॉर्ड क्रमांक 4 मधील 3 असे 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडून आलेल्या सदस्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, शिवसेना तालुका प्रमुख संजय तात्या वाळूकर, काँग्रेसचे विधानसभा गटनेते अ‍ॅड. अनंतराव वानखेडे, जिल्हा काँग्रेसचे सदस्य वसंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गफ्फार शहा, माजी सभापती गणेश शेवाळे यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले. या वेळी माजी सरपंच सुनील देशमुख, माधवराव कड्डक, विष्णू आखरे पाटील, गजानन नरवाडे, दिलीप आखरे, प्रल्हाद गोरे, रंजित लोढे, एकनाथ खराट, मदन काळदाते, संदीप लोढे, नारायण खोडवे, विलास कड्डक, सुनील जाधव, भिकाजी हरमकर, संतोष मेटांगळे, शरद केळे, विनोद ताकतोडे, अशोक म्हस्के उपस्थित होते.