मेहकरमध्ये घड्याळाची टिकटिक जोरात!; निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे डॉ. शिंगणे यांचे आवाहन
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच कामाला लागा, संघटन मजबूत करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मेहकरमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले.
मेहकर शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी पक्षाची तालुका व शहर आढावा बैठक नुकतीच घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी होते. जिल्हा निरिक्षक रवींद्र तौर, महिला निरिक्षक सौ. रिटा बाविस्कर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. मीरा बावस्कर, ॲड. साहेबराव सरदार, भास्करराव काळे, संपतराव देशमुख, मनोज दांडगे, सुभाष देव्हडे, पुरुषोत्तम पाटील पडघान, गजानन सावंत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी लक्ष्मण मंजूळकर, दत्ता घनवट, राहुल देशमुख, संदीप गव्हाळ, विलास बचाटे, कैलास जाधव, मेहबूब गवळी, सद्दाम कुरेशी, शिवाजी गारोळे आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन शहराध्यक्ष निसार अन्सारी यांनी केले. आभार कैलास सावंत यांनी मानले.