मशीन थांबली पण, पुन्हा धावली… स्पीड ब्रेकर्समुळेही कमी नाही झाली मतदानाची गती!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील तब्बल 498 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज, 15 जानेवारीला किमान 10 तास झालेल्या मतदानात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान कर्मचार्यांच्या हृदयाचे ठोके काही क्षण वाढले! मात्र या मशीन लगेच बदलण्यात आल्याने मतदानात कोणतीच अडचण आली नाही. यामुळे मतदान फुलटाईम सुरळीतपणे पार पडल्याने कर्मचार्यांसह जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणांनी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील तब्बल 498 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज, 15 जानेवारीला किमान 10 तास झालेल्या मतदानात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान कर्मचार्‍यांच्या हृदयाचे ठोके काही क्षण वाढले! मात्र या मशीन लगेच बदलण्यात आल्याने मतदानात कोणतीच अडचण आली नाही. यामुळे मतदान फुलटाईम सुरळीतपणे पार पडल्याने कर्मचार्‍यांसह जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणांनी सुटकेचा श्‍वास सोडला.



सकाळी 7ः30 वाजता प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी नियुक्त मतदान केंद्राध्यक्षाच्या मार्गदर्शनात मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी 10 ठिकाणच्या मशीन रुसल्या! अर्थात त्यात काही तांत्रिक बिघाड असल्याचे दिसून आले. मेहकर तालुक्यातील डोणगाव, हिवरा खुर्द, फैजलापूर व मादणी केंद्रावरील, खामगाव तालुक्यातील वाडी, मोताळा तालुक्यातील रिझोरा, खंडोपंत, वडगाव खंडोपंत, खेर्डी व उबाळखेड केंद्रावरील बॅलेट युनिट (मतदानासाठी बटन दाबावयाचे युनिट) तर फैजलपूर येथील कंट्रोल युनिटचा समावेश होता. मात्र प्रत्यक्ष मतदानापूर्वी हे युनिट बदलण्यात आल्याने दिवसभर मतदान सुरळीत पार पडले. बापरे मतदानावेळीच मशीन बंद… दरम्यान मोक पोल पूर्वी मशीन बिघडणे किरकोळ बाब ठरते. पण मतदान रंगात आले असताना बॅलेट वा कंट्रोल युनिट बंद होणे थोडी गंभीर बाब ठरते. राजेगाव (ता. सिंदखेडराजा) , देऊळगाव माळी (ता. मेहकर), शिरला नेमाने, भालगाव (ता. खामगाव), माटरगाव, गोलखेड, पाडसूल (ता. शेगाव), पळशी झाशी (ता. संग्रामपूर), काटी, महाळुंगी (ता. नांदुरा) या मतदान केंद्रावर मिळून 19 बॅलेट युनिट मतदान भरात असताना बंद पडले! मात्र केंद्रांवर असलेले राखीव युनिट लगेच जोडण्यात आल्यावर पुढील मतदान सुरळीत पार पडले.

दुसरबीड ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 68 टक्के मतदान झाले. गावातील 6 वॉर्डांतील एकूण 7 हजार 243 मतदारांपैकी 4 हजार 938 मतदारांनी हक्क बजावला. (छायाचित्र ः बाळासाहेब भोसले, सिंदखेड राजा)