भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष येणार चिखलीत; स्वागताची जंगी तयारी सुरू
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता पक्षाच्या युवा वाॅरीयरच्या बांधणीसाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील 23 ऑगस्ट रोजी चिखलीत येणार असून, नेते चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील व प्रदेश संयोजक अनुप मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संघटनात्मक बांधणीसाठी युवा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.
23 ऑगस्ट रोजी श्रीराम नागरी बँकेच्या जिजाऊ सभागृहात होणाऱ्या युवा वारीयर मेळावा आणि चिखली येथे दुपारी 2 वाजता व अमडापूर येथे दुपारी 3 वाजता प्रातिनिधिक स्वरूपात शाखा गठीत करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीसाठी 19 ऑगस्ट रोजी चिखली विश्राम भवनात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
बैठकीला जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, प्रभारी प्रदीप देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष काळे, निखिल पडघान, सागर पुरोहित, विजय वाळेकर, विजय खरे, राजीक शहा, आकाश चुनावाले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संतोष रामेश्वर काळे, वासुदेव हरिभाऊ राजपूत हरणी, कैलास भानुदास घाडगे मलगी, श्रीकृष्ण उत्तमराव पाटील केळवद, गजेंद्र शेषराव म्हस्के गांगलगाव, पंजाबराव देशमुख अंबाशी, श्रीकांत शिनगारे मिसाळवाडी, शिवाजी वाघ शेळगाव आटोळ, शिवशंकर सुरडकर बेराळा, गजानन देशमुख अमडापूर, ईश्वर माधवराव गायकवाड करणखेड, नितीन सुभाष पाटील डुकरे सावरगाव डुकरे, सचिन गरड करवंड, भागवत खेंते टाकरखेड मु., सिध्देश्वर मोरे राजपूत दिवठाणा, संदीप बाहेकर किन्होळा, गोपाळ तुकाराम शेळके पेठ, संदीप रामेश्वर म्हस्के पांढरदेव, नवलसिंग इंगळे चंदनपूर, भारत सोळंकी, बाळू मधुकर सोळंकी वरखेड, दिलीप रमेश इंगळे शेलूद, सतिष गावंडे कवठळ, दीपक भाकडे, सचिन सुभाष पाटील सावरगाव डुकरे, संदीप जाधव धोत्रा नाईक, गोपाल वाळेकर सोनेवाडी, ज्ञानेश्वर चवरे हिवरा नाईक, आकाश समाधान शेळके गोंधनखेड, वैभव अंकुश तायडे पेठ, कय्युम शहा सवणा, सतिश नवले सवणा, मुकुंद झाल्टे रानाअंत्री, विशाल थिंगळे काटोडा, पुरुषोत्तम पडघान मेरा, शिवाजी वाघ शेळगाव आटोळ, युवराज राप्ते, किशोर चेके, सुनिल जायभाये, रवि जाधव मालगणी, अनंता वाघ अंत्रीकोळी, निरज गायकवाड, रुषीकेश डुकरे भोगावती, आकाश इंगळे भानखेड, वैभव आखाडे केळवद, भास्कर कुटे, आनंद चव्हाण सातगाव भुसारी, शुभम भुमकर, मोहन खडके सवणा, सिध्देश्वर परिहार शे. जहागीर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.