भाजपा महिला मोर्चाचे अनोखे रक्षाबंधन…. पोलीस बांधव, माजी सैनिक, कोरोना योद्धांना बांधली राखी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी व कर्मचारी व भारतमातेच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.आज, २१ ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन चिखली, ग्रामीण रुग्णालय चिखली, पोलीस स्टेशन अमडापूर, प्राथमिक …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी व कर्मचारी व भारतमातेच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
आज, २१ ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन चिखली, ग्रामीण रुग्णालय चिखली, पोलीस स्टेशन अमडापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र उंद्री, प्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा, प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केळवद याठिकाणी जाऊन कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सभापती सौ. सिंधुताई तायडे, पंचायत समिती सदस्य सौ. मनिषाताई सपकाळ, नगरसेविका सौ. विमलताई देव्हडे, अर्चनाताई खबुतरे, मंगलाताई झगडे, सौ. सुनिताताई भालेराव, सुनंदाताई शिनगारे, कुंदाताई सावंत, सुलोचनाताई शेळके, गंगाताई तायडे, संगीताताई तायडे, कांचनताई मुऱ्हाळ, रेणुकाताई सावंत, ज्ञानेश्वरी केसकर, संगीताताई दुधाळे, पद्मा मुळावकर, रजनी बेलोकर, विमलताई पाटील, सुनिताताई शिवतारे, नंदाताई यंगड, रंजनाताई पैसोडे, प्रतिभाताई शिवतारे, वैशालीताई बेलोकर, राधाताई कापसे आदींची उपस्थिती होती.