बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी मोदींच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत पकोडे स्‍टॉल!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण दिवस पाळला जात असताना चिखली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगारी दिन पाळून वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यात आले. विधानसभा अध्यक्ष बाळू साळोख यांच्या नेतृत्वात पकोडा स्टॉल लावून पकोडे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी राम डहाके, पप्पू जागृत, अतहरोद्दीन काझी, सचिन बोंद्रे, किशोर सोळंकी, अर्जुन …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण दिवस पाळला जात असताना चिखली विधानसभा युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगारी दिन पाळून वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यात आले. विधानसभा अध्यक्ष बाळू साळोख यांच्या नेतृत्वात पकोडा स्टॉल लावून पकोडे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी राम डहाके, पप्पू जागृत, अतहरोद्दीन काझी, सचिन बोंद्रे, किशोर सोळंकी, अर्जुन गवई, प्रविण पाटील, प्रकाश राठोड, संजय गिरी, संजय सोळंकी, ज्ञानेश्वर इंगळे, आकाश साळवे, इम्रान खान, लक्ष्मण भिसे, कैलास जंगले, गौतम वानखेडे, संदीप चिंचोले, स्वप्नील सोळंकी आदी उपस्थित होते.