बुलडाणा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी सोहम झाल्टे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता पक्षाची बुलडाणा शहर बैठक नुकतीच झाली. तीत शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी सोहम झाल्टे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पक्षाचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, जिल्हा उपाध्यक्ष सौ.विजयाताई राठी, भाजपा शहर सरचिटणीस अरविंद होंडे, आशिष व्यवहारे, पंकज नागरे यांची उपस्थिती होती. नियुक्ती चे श्रेय भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर ,आमदार श्वेताताई महाले, भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख, भाजपा शहराध्यक्ष बुलडाणा सिध्दार्थजी शर्मा यांना असून मी त्यांचा आभारी आहे, असे श्री. झाल्टे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.