पालकमंत्र्यांची पसंती मिळाली अन्‌ खांडेभराड झाले अध्यक्ष!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुका खरेदी- विक्री संघाच्या अध्यक्षपदी पाराजी खांडेभरात बिनविरोध निवडून आले आहेत. पालकमंत्र्यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली अन् त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला. ८ ऑक्टोबरला ही निवडणूक पार पडली. वा. द. वानखेडे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त होते. तालुक्यातील अनेक सदस्य या पदासाठी इच्छुक …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुका खरेदी- विक्री संघाच्या अध्यक्षपदी पाराजी खांडेभरात बिनविरोध निवडून आले आहेत. पालकमंत्र्यांनी त्‍यांच्‍या नावाला पसंती दिली अन्‌ त्‍यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला.

८ ऑक्‍टोबरला ही निवडणूक पार पडली. वा. द. वानखेडे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त होते. तालुक्यातील अनेक सदस्य या पदासाठी इच्छुक होते. यात पाराजी खांडेभराड, रवींद्र गिते, संतोष शिंदे यांच्‍या नावाची चर्चा प्रामुख्याने सुरू होती. मात्र संघामधील सर्व बारा सदस्य हे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे समर्थक असल्याने पालकमंत्री कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. पालकमंत्र्यांनी पाराजी खाडेभराड यांच्या नावाला पसंती दिली. त्‍यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड यांच्‍यासह राजीव सिरसाट, अप्रीत मिनासे, संतोष खांडेभराड, अनिल रामाणे, गजानन पवार, गणेश बुरुकूल, अरविंद खांडेभराड अादी हजर होते.