नावालाच बॉस… मुकुल वासनिकांना डावलून रजनी पाटील यांना राज्‍यसभेची उमेदवारी!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यसभा उमेदवारीच्या शर्यतीत अखेरच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारणाऱ्या रजनी पाटील यांना अखेर राज्यसभेची उमेदवारी मिळाली! यावर कळस म्हणजे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करणारे राष्ट्रीय सरचिटणीस व “सीईसी’चे प्रभारी मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीने पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलीय!! यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना ऊत आला …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यसभा उमेदवारीच्या शर्यतीत अखेरच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारणाऱ्या रजनी पाटील यांना अखेर राज्यसभेची उमेदवारी मिळाली! यावर कळस म्हणजे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करणारे राष्ट्रीय सरचिटणीस व “सीईसी’चे प्रभारी मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीने पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलीय!! यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना ऊत आला असून, वासनिकांसह जिल्ह्यातील त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी रजनी पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे आणि वासनिकांच्या राजकीय भाग्याचा फैसला काही तासांतच होणार असल्याचे वृत्त बुलडाणा लाईव्हने काही तासांपूर्वीच प्रसारित केले. तसेच आज सोमवारी रात्री उशिरा उमेदवार कोण याचा फैसला होणार असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले, हे वृत्त अचूक ठरले. दरम्यान आज, २० सप्‍टेंबरला संध्याकाळी रजनी पाटील यांच्या नावावर अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले! अंतिम टप्प्यापर्यंत शर्यतीत असलेले मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीनेच रजनी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली, हे पत्र त्‍सुनामीच्या वेगाने दिल्ली ते गल्ली व्हायरल झाले, बुलडाणा जिल्ह्यात तर याचा वेग जास्तच होता.