नांदुरा तालुक्‍यात तिन्‍ही ठिकाणचे सरपंच बिनविरोध!

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यात आज, 19 मार्च रोजी तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात माळेगाव गोंडच्या सरपंचपदी सौ. प्रतिभा रवींद्र वाकोडे, जवळा बाजारच्या सरपंचपदी सौ. नलिनी अशोक डिवरे तर अलमपूरच्या सरपंचपदी सौ. नंदाताई ठोबे यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या तीनही ठिकाणचे सरपंचपद आरक्षित …
 

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यात आज, 19 मार्च रोजी तीन ग्रामपंचायतींच्‍या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात माळेगाव गोंडच्‍या सरपंचपदी सौ. प्रतिभा रवींद्र वाकोडे, जवळा बाजारच्‍या सरपंचपदी सौ. नलिनी अशोक डिवरे तर अलमपूरच्‍या सरपंचपदी सौ. नंदाताई ठोबे यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्‍याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या तीनही ठिकाणचे सरपंचपद आरक्षित उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त होते.त्यामुळे नव्याने आरक्षण काढून आज सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.