नांदुरा तालुक्यातील 15 गावांची कमान यांच्या हाती… वाचा कोण आहेत सरपंच, उपसरपंच…
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होऊन 18 जानेवारीला निकाल जाहीर झाला. तेव्हापासून या ग्रामपंचायतींचा कारभार कुणाच्या हाती जाणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आज, 9 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील एकूण 15 गावांचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले आहेत.ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल …
Feb 9, 2021, 19:08 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होऊन 18 जानेवारीला निकाल जाहीर झाला. तेव्हापासून या ग्रामपंचायतींचा कारभार कुणाच्या हाती जाणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आज, 9 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील एकूण 15 गावांचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले आहेत.ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली.
हे आहेत सरपंच, उपसरपंच…
- दादगाव ः सरपंच सौ. मीरा गणेश काटे, उपसरपंच सौ. सविता नारायण बगे.
- नारखेड ः सरपंचपद रिक्त, उपसरपंच सौ. बबिता नरसिंग डाबेराव
- शेलगाव मुकुंद ः सरपंच सौ. अश्विनी अमोल हेरोडे, उपसरपंच सौ. शीतल गणेश कारागळे
- वाडी ः सरपंच अनिल रामेश्वर चोपडे, उपसरपंच कृष्णा रामधन गव्हाळे (निवडून)
- रसूलपूर ः सरपंच सौ. दीपाली अजिंक्य चोपडे, उपसरपंच सौ. विभा संदीप जुनगडे (अविरोध)
- बेलाड ः सरपंच सौ. वैशाली सुधाकर साबे, उपसरपंच मिलिंद नामदेव वाकोडे (अविरोध)
- येरळी ः सरपंच प्रियांका प्रकाश आठवले, उपसरपंच सौ. सुवर्णा नीलेश वेरुळकार (अविरोध)
- पिंपळखुंटा धांडे ः सरपंच गजानन महादेव धांडे, उपसरपंच सौ सुनीता विनोद वाकोडे (अविरोध)
- लोणवडी सरपंच सौ. नलिनी प्रल्हाद फासे, उपसरपंच सौ. सिंधुताई शेषराव तायडे (अविरोध)
- वडी ः सरपंच पुंजाजी उखर्डा धोटे, उपसरपंच गोपाळ पुंजाजी भोकरे (अविरोध)
- धानोरा बुद्रूक ः सरपंच सौ. प्रमिला गजानन वनारे, उपसरपंच प्रदीप सुरेश मनस्कार (अविरोध)
- आंबोडा ः सरपंच सौ. मंदा शिवचरण भोंगे, उपसरपंच अजमत खान न्यामत खान (अविरोध)
- वडाळी ः सरपंच सौ. विद्या ज्ञानेश्वर वक्ते, उपसरपंच सौ. योगिता देवानंद सरदार (अविरोध)
- खैरा ः सरपंच सौ. पुष्पलता लहू दिवाने, उपसरपंच आशिष गजानन टाकतोडे ( निवडून)
- पोटळी ः सरपंच सौ. सुशीला किसन पाटील, उपसरपंच राजू श्रीराम तायडे ( निवडून)
नारखेड येथे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला असून तेथे या प्रवर्गाचा महिला उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसल्याने रिक्त राहिले, असे नायब तहसीलदार संजय मार्कड, आर. आर. बोदडे यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले.