नांदुरा ः 7 ग्रामपंचायतींच्या 10 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या दहा रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रारूप मतदार यादी संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर 11 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 11 ते 16 फेब्रुवारीपर्यंत राहील. 18 फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ज्या सात ग्रामपंचायतींच्या 10 रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात इसरखेड, पातोंडा, सिरसोडी, शेंबा खुर्द, दादगाव, अमलपूर, पलसोडा या गावांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे, नायब तहसीलदार श्री. मार्कड, आर. आर. बोडदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.