देऊळगाव राजा पं.स. सभापती सौ. रेणुका बुरुकूल यांचा राजीनामा
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुका गणेश बुरुकूल यांनी आपल्या पदाचा राजीनामा ९ जुलैला जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाठवल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांच्यामार्फत त्यांनी हा राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आपला कार्यकाळ पूर्ण होताच पदाचा राजीनामा दिला आहे, असे त्यांनी सांगितले. सौ. रेणुका बुरुकूल यांनी कोरोना काळात केलेल्या उपाययोजना आणि राबवलेले उपक्रम कौतुकास्पद ठरले. त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून दीड महिन्यापासून सदस्य मागणी करत होते. आता त्यांना पालकमंत्री डॉ. शिंगणे पुन्हा संधी देतात की नवीन सभापती देतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहेत.