देऊळगाव राजा ः मतदानयंत्रे सीलबंद!; 14 जानेवारीला त्या त्या गावांत पाठवणार
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, निवडणुकीसाठी मतदान मशीन आज 12 जानेवारीला सिलबंद करण्यात आल्या आहेत. नगरपालिका टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूममध्ये या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन पोलीस बंदोबस्तात व उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आल्या. 14 जानेवारी रोजी या मतदान …
Jan 12, 2021, 15:10 IST
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, निवडणुकीसाठी मतदान मशीन आज 12 जानेवारीला सिलबंद करण्यात आल्या आहेत.
नगरपालिका टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूममध्ये या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन पोलीस बंदोबस्तात व उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आल्या. 14 जानेवारी रोजी या मतदान मशिन निवडणूक लागलेल्या गावी पोहचवल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय आधिकारी तहसीलदार सारिका भगत यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार प्रिती जाधव, नायब तहसीलदार कुलमते व सहा प्रभागांतील आर. ओ., पोलिस कर्मचारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.