तीनही पराभूतांना मते पडली 201… विजय झालेल्यांना 224, 223, 222!; भारीच की नाही!!
ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचा पराभूतांना संशय; निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार
मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक 1 मधील तीनही पराभूत उमेदवारांना 201 सारखीच मते पडली व विजयी उमेदवारांना 224, 223, 222 अशी एका पाठोपाठ मते पडली आहेत. त्याचबरोबर नोटा 2, 3, 4 मते पडली. या निकालामुळे पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त करत मेहकरच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
15 जानेवारी रोजी मतदान सुरू असताना मशीनचा आवाज बंद झाला होता. तेव्हा सुध्दा मतदान प्रतिनिधींनी हरकत घेतली होती परंतु संबंधित निवडणूक अधिकारी यांनी हरकतीची दखल घेतली नाही व मतदान प्रक्रिया पार पडली होती, असा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे. संशयित ईव्हीएम मशिनची योग्य तपासणी करुन मतमोजणी करावी अन्यथा मतदान प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा नागापूर येथील अनिता लक्ष्मन जुनघरे यांच्यासह दोघांनी दिला आहे.